जिल्ह्यात विनाकारण फिरणारी 142 वाहने पोलीसांकडून जप्त

0

जळगाव- लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असल्याने तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरातच राहण्याचा सल्ला शासनाने दिलेला आहे. असे असूनही काही नागरीक व वाहनचालक विनाकारण घराबाहेर फिरत असतात तसेच वाहनेही घेऊन फिरतात. यास पायबंद घालण्याच्या सुचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी पोलीस विभागास दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस विभागाने जिल्हाभरात धडक मोहिम राबवून जिल्ह्यात 142 वाहने जप्त केली असल्याची माहिती पोलीस उप अधिक्षक (मुख्यालय) दिलीप पाटील यांनी दिली आहे.


जप्त वाहनांची संख्या
एम.आय.डी.सी,जळगाव पोलीस स्टेशन-दुचाकी-40, चारचाकी-1, जळगाव शहर पोलीस स्टेशन दुचाकी-16, जिल्हापेठ पोलीस स्टेशन-दुचाकी-4, तीनचाकी-6, रामानंद पोलीस स्टेशन- तीन चाकी-1, नशिराबाद पोलीस स्टेशन- दुचाकी-12, चोपडा पोलीस स्टेशन- दुचाकी-1, अमळनेर पोलीस स्टेशन-दुचाकी- 2, मारवड पोलीस स्टेशन-दुचाकी-7, पारोळा पोलीस स्टेशन- दुचाकी-9, एरंडोल पोलीस स्टेशन- दुचाकी- 16, चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन- दुचाकी-2, चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन- दुचाकी-2, भडगाव पोलीस स्टेशन- दुचाकी- 15 कासोदा पोलीस स्टेशन-दुचाकी-1 मेहुणबारे पोलीस स्टेशन-दुचाकी-4, चारचाकी-2. अशाप्रकारे जिल्ह्यात दुचाकी 132, चारचाकी 3 तर तीनचाकी 7 वाहने जप्त करण्यात आली आहे.