पुणे । पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतीमधील 42 प्रशासकीय अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या आहेत. बाजार समितीमधील काही विभागांमध्ये रिक्त असणार्या जागी इतर विभागातील अधिकारी व कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फुलबाजार विभागप्रमुखपदी मंगेश पठारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्याकडे यापुर्वी भरारी पथक प्रमुख म्हणून जबाबदारी होती. त्यांच्या जागी निलेश हिंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संभाजी काळजे यांची सर्वसाधारण विभागप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर आरोग्य विभाग प्रमुख म्हणून नूर महंमद खान यांची नियुक्ती करण्यात आली ओह.
भाजीपाला विभाग प्रमुख म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आलेले प्रकाश मारणे यांची नियुक्ती कायम करण्यात आली आहे. भांडार शाखा विभागप्रमुख म्हणून महादेव सावंत, सीसीटीव्ही कॅमेरा विभाग प्रमुख किरण घुले, ग्रंथालय विभागप्रमुख सुनिल मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घुले सहायक सचिव
फुल बाजार विभाग प्रमुख म्हणून यशस्वीपणे जबाबदारी सांभाळलेले एन.डी. घुले यांची सहायक सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी बाजार समितीमध्ये विविध विभागांवर काम केले आहे. घुले यांनी यापुर्वी फळे व भाजीपाला विभागप्रमुख, फुलबाजार विभागप्रमुख, भरारी पथक विभागप्रमुख, पिंपरीचिंचवड विभाग प्रमुख, वजनकाटा विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.