बाजार समिती आवाराच खरेदी विक्री करावी

0

नवापूर । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अधिकारी व अनुज्ञप्तीधारक व्यापार्‍यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले. बाजार समितीत शेतमालाची खरेदी विक्री होत नसल्याने बाजार समितीचे उत्पन्न बुडत आहे. दुसरीकडे शेतकर्‍याला शासनाच्या सोयी सवलतींचा लाभ देता येत नसल्याचे सचिव अमोल पिंपळे यांनी सांगितले. तसेच बाजार समितीने व्यापार्‍यांना धान्य साठवणुकीची सोय उपलब्ध करून द्यावी व सोय उपलब्ध होईस्तोवर व्यापार्‍यांना आहे त्या ठिकाणी व्यापार करु द्यावा, अशी भूमिका व्यापार्‍यांचे प्रतिनिधी म्हणून गुलामभाई व्होरा यांनी मांडली. शासन आदेशाचे पालन करून बाजार समितीस सहकार्य करण्याची भूमिका व्यापार्‍यांनी घ्यावी असे आवाहन जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पूरी यांनी केले.

दोन कोटी खर्चाचे प्रस्ताव सादर
आ. सुरूपसिंग नाईक, जिल्हा उपनिबंधक एस. वाय. पुरी, तहसीलदार प्रमोद वसावे, पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत, नायब तहसीलदार राजेंद्र नजन, बाजार समितीचे चेअरमन मधुकर नाईक, संचालक गिरीश गावीत, सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी व रणजित पाटील उपस्थित होते. ाजार समितीच्या नवापूर, विसरवाडी व खांडबारा कार्यक्षेत्रात व्यापार करणारे व्यापारी बैठकीस उपस्थित होते. प्रथमच आदिवासी विकास विभागाकडून कृषी उत्पन्न बाजार समित्यांना बळकटी आणण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास मंडळ अंतर्गत भरीव तरतूद करण्यात आल्या आहेत. सुमारे तीन कोटी रुपये नंदुरबार जिल्ह्यास प्राप्त झाले असुन त्या माध्यमातून नवापूर बाजार समितीत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होइल असे उपनिबधकांनी स्पष्ट केले. शासन नियमानुसार मात्र बाजार समिती आवारातच शेतमाल खरेदी विक्री करण्यात यावी यावर जिल्हा उपनिबंधक ठाम राहिलेत. आ. सुरूपसिंग नाईक यांनी व्यापारी बांधवासाठी सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतुने बाजार समिती आवारासाठी दोन कोटी खर्चाचे प्रस्ताव जिल्हा नियोजन विकास मंडळात सादर केल्याचे सांगितले.