बाजीरावच्या आयुष्यात आली दुसरी मस्तानी?

0

दीपिका आणि रणवीर यांच्यात तब्बल पाच वर्ष अफेअर होतं. काही दिवसांपूर्वीच दोघांच्या साखरपुड्याचं वृत्तही आलं होतं. दीपिका आणि रणवीरमध्ये कोणतीही कटूता नसल्याचं सांगितलं जात आहे. फक्त एकमेकांना वेळ न देता येत नसल्याने दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह दूर झाले. बॉलिवूड इंडस्ट्रीतील हॉट कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादूकोण सर्वांनाच आवडणार्या जोड्यांपैकी एक‘बाजीराव मस्तानी’ प्रमाणे या दोघांचीही लव्हस्टोरी चांगलीच गाजली. काही दिवसांपूर्वीच दीपिका पादुकोणचं टेनिस स्टार नोवाक जोकोविचसोबत अफेअर असल्याच्या चर्चा झाल्या होत्या. मात्र आता रणवीर आणि दीपिका यांच्या अफेअरबाबत धक्कादायक माहिती समोर येतीये. या दोघांमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी कायला मिळत होती. मात्र आता ऊशललरप उहीेपळलश्रश ने दिलेल्या वृत्तानुसार, या दोघांचं कन्फर्म ब्रेकअप झालं आहे. बॉलिवूडचे बाजीराव आणि मस्तानी आता एकत्र नाही हे तितकेच खरे ठरले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांना त्यांनी हा एकप्रकारे धक्काच दिला आहे. कारण या जोडीची क्रेझ तरूणाईमध्ये जास्त आहे. मात्र या दोघांनी याबाबत काहीही सांगितलं नाहीये. त्यामुळे यात किती तथ्य आहे हे त्यांनाच माहिती आहे. मात्र मीडिया रिपोर्टनुसार त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा होतीये. सुत्रांच्या माहितीनुसार, दीपिका पादूकोण आणि रणवीर सिंह यांच्यात कोणताही वाद, तणाव नाही. फक्त कामाच्या दबावामुळे दोघांमध्ये हळू हळू दुरावा आला आहे. इतकंच नाही तर रणवीरने तर नवी गर्लफ्रेण्डही शोधली आहे. तर फिल्मी बिट वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, रणवीर आणि दीपिका गेल्या पाच वर्षांपासून एकत्र होते. आता ते वेगळे झाले असून कपल नाहीयेत.