बाजीराव, काशीबाई आणि मस्तानी तिघांनी एकत्र केला ‘पिंगा’वर डान्स!

0

मुंबई : सध्या प्रियांका आणि निकच्या दुसऱ्या रिसेप्शन पार्टीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. अशातच  त्याच्या पार्टीमधील एक विडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. संजय लिला भन्साली यांचा ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपटातील ‘पिंगा’ या गाण्यात प्रियांका आणि दीपिकाच्या डान्सने ३ वर्षा पूर्वी प्रेक्षकांच्या मनावर भूरळ पाडली होती. आजही हे गाणं ऐकलेकी दीपिका आणि प्रियांकाचा डान्स डोळ्यासमोर दिसतो.

https://www.instagram.com/p/BroFY0Nhtiu/?utm_source=ig_embed

अशातच या दोघी पुन्हा एकदा पिंगा या  गाण्यावर थिकारल्या. प्रियांकाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये दोघानीं या गाण्यावर डान्स केला. यांच्या सोबत बाजीराव रणवीरने सुद्धा ठेका धरला. या पार्टीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. मात्र, या पार्टीत दीपिका आणि प्रियांकाचा डान्स हायलाइट ठरला.