बाटलीबंद पाण्यासाठी किंमतीचे बंधन नाही!

0

नवी दिल्ली : हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये विकले जाणारे बाटलीबंद पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ एमआरपीप्रमाणे विकण्याचे बंधन नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील बाटलीबंद पाणी आणि खाद्यपदार्थ एमआरपीप्रमाणे विकण्याचे बंधन नसावे याकरिता हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाकडून न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारने ‘लिगल मेट्रोलॉजी अ‍ॅक्ट’ अंतर्गत पॅकिंग केलेले पाणी किंवा खाद्यपदार्थ एमआरपीपेक्षा जास्त किंमतीत विकणे हा गुन्हा आहे. या कायद्याचे उल्लंघन केल्यास 25 हजार रुपये दंड किंवा तुरुंगवास होऊ शकतो, असे न्यायालयात सांगितले. मात्र, न्या. रोहिंटन नरिमन यांच्या अध्यक्षतेखालील न्यायालयाने सरकारचा हा दावा फेटाळून लावला असून, या कायद्याच्या तरतुदी हॉटेल्स आणि रेस्टॉरंटसाठी लागू नाहीत, असा महत्वपूर्ण निकाल दिला.