चाळीसगाव । तालुक्यातील बाणगाव येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेत शाहु महाराजांनी 21 सप्टेंबर 1917 मध्ये प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले. या कायद्याला 100 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने शाहु दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी समाज कल्याण विभागाचे अनिल पगारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्याहस्ते शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी पगारे म्हणाले की, छत्रपती शाहु महाराजांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी 21 सप्टे. 1917 रोजी प्राथमिक शिक्षण आपल्या संस्थानात मोफत व सक्तीचे केले. शिक्षण परिवर्तनाचे साधन असुन वही पेन पुरता मर्यादित न ठेवता बुध्दीला सत्याकडे भावनेला मानवतेकडे आणि श्रमाकडे नेणारे असावे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विजय महाजन, शालेय शि.स.अध्यक्ष भिकन पठाण, उपाध्यक्ष श्री भाईदास गोलाईत, तंटामुक्ती अध्यक्ष लाला परदेशी उपस्थित होते. श्री भोकरे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी शिनकर, चौधरी, मालपुरे, कोळी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.