बाणगाव येथे गणपती मंदिराच्या बांधकामाचे भुमीपुजन

0

चाळीसगाव । बाणगाव ता चाळीसगांव येथे लोकसहभाग व लोकवर्गीणीतुन सुसज्ज सभा मंडप व विठ्ठल रुख्माई गणपती मंदिराच्या बाधकामाची सुरुवात करण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी होते.परंतु या वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामळे गावालगत धरण हे जवळजवळ 95 टक्के भरल्यामुळे शेतकरी, शेतमजुर, कामगार वर्ग व परिसरातील सर्व घटक ब-यापैकी समाधानी आहेत. म्हणुन येणार्‍या दोन वर्षात शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊन कामगार व शेतमजूर यांना देखील काम मिळणार आहे.

गावात सामाजिक व सार्वजनिक उपक्रमासाठी सुसज्ज सभा मंडप नाही,त्याचप्रमाणें विठ्ठलाचे मंदीर नाही. ही गरज लक्षात घेऊन गावातील ग्रामस्थांनी सार्वजनिक सभा घेऊन यावर चर्चा केली. सर्वानुमते लोकांनी या शुभ कामासाठी देणग्या जाहीर केल्या. व लोकवर्गणीतून या वास्तु उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. या कामासाठी सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. या बाधकामासाठी जवळपास 30 लाख रु खर्च येणार असुन पुर्ण खर्च लोकवर्गणीतून करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे तिन वर्षापूर्वी आमदार उन्मेष दादा पाटील यांनी देखील यासाठी आमदार निधीतून पाच लाख रुपये देण्याचे आश्‍वासन बाणगाव येथे सत्कार सभेत केले आहे. या शुभ कामासाठी गावातील जेष्ठ नागरिक प.पू.संत माधवदासजी महाराज, पांडुरंग पवार, लाला परदेशी, विजय(बारकु) परदेशी, रामराव शेलार, साहेबराव शेलार, धनराज शेलार, नारायण शेलार, सुरेश वाणी, भाऊसाहेब परदेशी, राजु पवार, संजय परदेशी, दगडू गोपाळ, विजय परदेशी(सरपंच), अरविंद परदेशी व भाईदास गोलाईत आदी ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.