बाणेर : मसाज पार्लरच्या नावाखाली चालणार्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट उघड करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली. कारवाईत एका मुलीची सुटका केली असून मसाज पार्लरची मालक व तिच्या पतीला अटक केली आहे.
मोहिनी अर्जुन दोडके (27, बाणेर) व अर्जुन शिवदास दोडके अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचे बाणेर येथील शिवनेरी कॉलनी परिसरातील फ्लॉट क्रमांक 5मध्ये हेअर अॅन्ड स्पा युनिसेक्स मसाज सेंटर आहे. येथे मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू आहे, अशी माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे खेच्या अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने पडताळणी करून छापा टाकला. त्यावेळी तेथील एका मुलीची पोलिसांनी सुटका केली. तर मसाज सेंटरची मालक मोहिनी व अर्जुन दोडके यांना अटक केली. गुन्हे शाखेचे पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पाटील, राजेश उंबरे, राजेंद्र कचरे, गीतांजली जाधव, सरस्वती कागणे, सचिन शिंदे, तसेच चतुःशृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद ढोमे, पोलीस निरीक्षक(गुन्हे) वैशाली गलांडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.