औंध । बाणेर, बालेवाडी, पाषाण प्रभाग क्रमांक 9मध्ये नगरसेविका ज्योती कळमकर यांच्या विकास निधीतून विकासकामांचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. निवडणुकीपूर्वी दिलेली सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत, असे यावेळी कळमकर यांनी सांगितले. आमदार मेधा कुलकर्णी, नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, गणेश कळमकर, लक्ष्मण सायकर, बबनराव सायकर यांच्या हस्ते विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.
यामध्ये श्रीनाथ सोसायटी येथे ड्रेनेज लाइन व स्ट्रीट लाइट बसविणे, गौरीनंदन अपार्टमेंट, रोहन सेहेर येथे स्ट्रीट लाइट बसवणे, राघू नाना बागेत पाण्याची लाइन टाकणे, पारखे शिंदे मळ्यात डेनेज लाइन टाकणे आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अर्जुन पारखे, ज्ञानेश्वर पारखे, एस. एम. कुलकर्णी, नामदेव कळमकर, चांगदेव कळमकर, चैत्राली कळमकर, गीता पारखे, सारिका पारखे, दिनेश कळमकर, मंदार राराविकर, संतोष तोंडे, नितिन खोंड, सर्जेराव कदम, अभय बागल, राहुल पारखे, प्रकाश तापकीर तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.