बाणेर भागात उभारणार ‘स्मार्ट फार्मर’ मार्केट

0

पुणे : पुणे स्मार्ट सिटीकडून पदपथावरील विक्रेत्यांसाठी बाणेर भागात स्मार्ट फार्मर मार्केट उभारले जाणार आहेत. त्यासाठी बाणेर येथील ओटा मार्केटचे आरक्षण असलेल्या सर्वे. नं. 85मधील महापालिकेच्या जागेची मागणी करण्यात आली आहे.

महापालिकेकडून या जागेवर जेएनएनयुआरएम अंतर्गत हे ओटा मार्केट विकसित करण्यात आले आहे. मात्र, अद्याप त्याचा वापर पूर्ण क्षमतेने सुरू नाही. महापालिका आणि स्मार्ट सिटीकडून करण्यात आलेल्या संयुक्त पाहणीत ही बाब समोर आली होती. ही बाब लक्षात घेऊन स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अत्याधुनिक ओटा मार्केट विकसित करून त्याला ‘स्मार्ट फार्मर मार्केट’ म्हणून विकसित करण्यासाठी ही आरक्षित जागा तातडीने स्मार्ट सिटीला हस्तांतरित करावी, अशी मागणी स्मार्ट सिटीने महापालिकेस पत्राद्वारे केली आहे.