बातमीत नाव छापल्यावरून पत्रकाराला मारहाण

0

जामनेर – दोन दिवसांपुर्वी देवी विसर्जनाच्या दरम्यान झालेल्या वादाच्या बातमीत वडीलांचे नाव छापल्यावरून मुलाने साथीदारांसह येवून पत्रकाराला लाकडी दांड्याने मारहाण केल्याची घटना २१ तारखेला शहरातील गांधी चौकात घडली. याबाबत अधिक माहीत अशी की, दोन दिवसांपुर्वी देवी मिरवणूक व विसर्जनाला काही अतिउत्साही युवकांच्या बेजबाबदार वागण्याने घटनेला गालबोट लागले होते. त्या घटनेबाबत दुसऱ्या दिवशी जामनेर पोलिस स्टेशनला नोंद करण्यात येवून संबंधिता विरूध्द गुन्हाही दाखल केला. त्या घटनेचे जामनेर पोलिस स्टेशनच्या अधिकृत सुत्रांकडून वृत्त संकलन करून तशी बातमी प्रकाशीत केली. मात्र त्या फिर्यादीत इतर लोकांची नावे असूनही बातमीत फिर्यादी म्हणून फक्त माझ्या वडिलांचेच नाव का छापले असा आरोप करीत. नगरसेवक बाबूराव हिवराळे यांच्या मुलाने सोबतच्या काही जणांसह पत्रकार लियाकत सैय्यद यांना शहरातील गांधी चौकात गाठून लाकडी दांड्याने मारहाण केली असल्याची घटना घडली.याबाबत जामनेर पोलिस स्टेशनला संबधिता विरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत चालू होते. या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून. अशा घटनांमुळे लोकशाहीला मारक असे वातावरण निर्माण केले जात असल्याच्या सुचक प्रतिक्रिया काही बुद्धीजिवी मंडळींनी व्यक्त केल्या.