बापट यांच्या कार्यालयासमोर राष्ट्रवादीची चूल

0

पुणे । भाजप सरकारच्या वाढत्या महागाईच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पालकमंत्री गिरीश बापट यांच्या कसबा गणपती मंदिरासमोरील कार्यालयासमोर चूल मांडून कार्यकर्त्यांनी निषेध केला.

यावेळी भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘या महागाईचे करायचे काय सामान्य जनतेने खायचे काय?’, ‘महागाईने जनता पेटली, अच्छे दिनची हौस फिटली’, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी दिल्या.पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष खा. वंदना चव्हाण, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष रुपाली चाकणकर, अशोक राठी, शशिकला कुंभार, शिल्पा भोसले, राकेश कामठे, रवींद्र माळवदकर, भोलासिंग अरोरा, अनिस सुंडके, बाळासाहेब बोडके, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. खा. चव्हाण म्हणाल्या, सरकारने निवडणुकीपूर्वी महागाईविरोधी आवाज उठविला होता. महागाई कमी होईल, परंतु दिवसेंदिवस भाव वाढतच चालले आहेत. पेट्रोल, गॅस, भाजी अशा दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर वाढत आहेत. वाढत्या महागाईने जनता त्रस्त झाली असून ‘अच्छे दिन हेच का?’ असा सवाल जनता विचारत आहे.

केंद्र आणि राज्य सरकारला पेट्रोलचे दर नियंत्रणात ठेवण्यात सपशेल अपयश आल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांनी सायकल रॅली काढत निषेध आंदोलन केले. राष्ट्रवादी पुणे युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष राकेश कामठे यांच्या नेतृत्वाखाली या रॅलीची सुरुवात गुडलक चौकातून झाली, तर पालकमंत्री कार्यालयासमोर समारोप करण्यात आला. यावेळी वाढत्या महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फलक लावले होते. या आंदोलनात स्थायी समिती अध्यक्ष बाळासाहेब बोडके, कुणाल वेडे-पाटील, शरद दबडे, पराग ढेणे, अमोल ननावरे, रुपेश संत, फहिम शेख, नितीन राठोड, जावेद इनामदार, निलेश शिंदे, गजानन लोंढे, संदीप काळे, विकी वाघे, निखिल बटवाल, रोहित जसवंते, विक्रम मोरे, भानुदास शिंदे, सौरभ माने यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.