शिरपूर। स्वामी विवेकानंद सांस्कृतिक मंडळ व स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ,शिंदखेड़ा शहर व परिसरात विविध सामाजोपयोगि व तरुणासाठी प्रेरणात्मक कार्यक्रम करत आलेली आहे.त्यापुढील एकपाऊल म्हणून तरुणांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके उपलब्ध झाली पाहिजे ह्या हेतुने मा.बापूसाहेब दगा चौधरी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन पुस्तकालयाचे उदघाटन जिल्हाअध्यक्ष भाजपयुवामोर्चा राम भदाणे व चेअरमन,बिजसनी पतसंस्था डॉ.रविन्द्र दादा देसले यांच्या हस्ते करण्यात आले.
सार्वजनिक संस्थेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तके
ह्याप्रसंगी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख ,माजी उपनगराध्यक्ष दीपक देसले,दगा चौधरी, नगरसेवक कीरण चौधरी, विनायक पवार ,प्रा.बोरदे, प्रा.जी. के.परमार, अमोल मराठे , शहराध्यक्ष, युवा मोर्चा संदीप पाटील ,रविंद्र गिरासे,प्रा.संदीप गिरासे,दिनेश चौधरी ,प्रा.देवेन्द्र नाईक,नारायण गुरव,प्रविण पाटिल,निम्बा चौधरी इ.उपस्थित होते. शिंदखेडा शहरात प्रथमच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी एखाद्या सार्वजनिक संस्थेकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुस्तके उपलब्ध करण्यात आलीत. मार्गदर्शन पुस्तकालया तर्फे दर 15 दिवसानी स्पर्धा परिक्षेच्या संदर्भातील विविध विषयांचे मार्गदर्शन केले जाईल असे आयोजकानी ह्यावेळी संकल्पना व्यक्त केली.
उपयोग गरजू विद्यार्थ्यांनी घ्यावा
ह्या योजनेचा उपयोग गरजू विद्यार्थ्यानी मोठ्या प्रामाणावर केला पाहिजे असे मान्यवरानी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.सूत्रसंचलन चेतन गुरव यांनी व उपस्थितांचे आभार कुणाल गुरव यांनी मानले. दिनेश चौधरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उमेश चौधरी,नितिन गुरव, अरविंद गुरव, गौरव ठाकुर, दीपक गुरव, भरत गुरव व सांस्कृतिक मंडळाच्या सदस्यानी परिश्रम घेतलेत.
यांची होती उपस्थिती
ह्यावेळी प्रमोजसिंह राजपूत,उदय देसले,योगेन्द्रसिंह परदेशी,दत्तात्रय पाटिल,संदीप साळुंखे,भटू शिंपी,आबा गुरव,विजय शिंपी,कृष्णा गुरव,प्रवीण गुरव,गणपत गुरव,नीलेश निकम ,अभिजीत पाटिल,मंडलिक पाटिल,विशाल वाघ,तुषार देसले, भूषण गुरव,विनोद देसले,कुणाल गुरव,सन्दीप देसले,चेतन भामरे,विवेक ठाकुर,योगेश भामरे,रॉकी टेलर,बबलू भाऊ पाटिल ,दगडू भामरे,हितेश चौधरी,जीतेंद्र गुरव, विजय निकम,वैभव चौधरी,भैय्या वाघ,ललित सोनार,प्रमोद पाटिल,गोलू गुरव इ.उपस्थित होते.