पुणे । गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्या निमित्ताने सर्वत्र बाप्पाच्या आगमाची जय्यत तयारी सुरु झाली आहे. घरच्या गणपतीची आरस करण्यासाठी रेखीव मखरे, विद्युत रोषणाई , फुले आणि नैवेद्याच्या तयारीसाठी पुणेकरांची दुकानांमध्ये झुंबड उडालेली आहे. बाप्पाच्या आगमनाच्या तयारीतील सर्वात्र महत्वाचा भाग म्हणजे मखर.. नोकरदार वर्गाने सजावट करण्यासाठी जास्त ताण घेण्याची गरज नसून सध्य बाजारपेठांमध्ये थार्माकोलचे फोल्डिंगचे मखर सहज उपलब्ध आहेत. आणि सध्या जय मल्हार, गोल घुमट, 12 ज्योर्तिलिंगच्या मखरांना भाविकांची जास्त मागणी आहे.
चित्रपट, मालिकेच्या सेटच्या प्रतिकृतींची चलती
सध्या प्रसार माध्यमांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या अध्यात्मिक मालिकांच्या सेट ची प्रतिकृतींची चलती पहायला मिळत आहे. जय मल्हार या मालिकेचा सेटची जास्त विक्री होत आहे. त्याचप्राणे बाहुबली या सुप्रसिद्ध चित्रपटातील महाल देखिल जास्त मागणी आहे. या मखरांच्या किंमती देखिल सर्वसामान्यांना परवडणार्या आहेत.
मखरांची विविधता…!
शंभर रुपयांपासून ते अडीज हजारच्या पुढे मखर उपलब्ध आहेत. दोन बाय पाचच्या मखरची किंमत साधारण 300 तर तीन बाय चार ची किंमत 400, चार बाय चार ची किंमत 600, आठ बाय पाच ची किंमत दीड हजार व 3 बाय 6 ची किंमत अडीज हजार अशी आहे. तसेच प्रतीवर्षीप्रमाणे लाकडाच्या मखर ला देखिल मागणी असून विविध प्लॅस्टिकची फूले, झिरमिळ्या, रंगिबेरंगी नेट, रंगीत पताके लावून ही मखरे सजवण्यात आली आहेत.
अठवड्याभरापासून ग्राहक खरेदीसाठी गर्दी करत आहेत. यंदा विविध प्रकारचे मखर बाजारपेठेत दाखल झालेले आहेत. मोर- बासरी मखर, अष्टविनायक, ज्योर्तिंलिंग, जयमल्हार सारख्या मखरांना जास्त मागणी आहे. तसेच लाकडा पासून बनलेले मखर देखिल नागरीक खरेदी करत आहेत.
-अमरदिप लामतुरे, स्वर्गा डेकोरेशन, नारायणपेठ