जळगाव। कुठल्याही 91.60 हॉलमार्क सोन्याच्या दागिन्यांची रिप्लेसमेंट सोपी होणार..! ज्या वजनाचा दागिना बदलणार; त्याच वजनाचा नवा दागिना मिळण्याची हमी. ग्राहकाने द्यायची नव्या दागिन्याची केवळ घडणावळ महाराष्ट्र आणि इतर राज्यातील सोन्याच्या दागिन्यांच्या ग्राहकांचा गेली 43 वर्षे परंपरागत विश्वास जपणार्या सुप्रसिध्द रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने ग्राहकांच्या थेट हिताचा निर्णय घेतला आहे. व्यावसायिक परंपरागत सोने दर आकारणीत बदल रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी घेतला आहे. नव्या दर आकारणीमुळे ग्राहकांना आता सोन्याचे जुने 91:60 हॉलमार्क प्रमाणित दागिने बदला करतांना कोणत्याही प्रकारची घट लागणार नाही. म्हणजेच बदल्यात देण्यासाठी ज्या वजनाचा सोन्याचा दागिना आणला आता त्याच वजनात नवा दागिना ग्राहकांना खरेदी करता येईल.
सोने अलंकाराचे दोन तर चांदीचे एक स्वतंत्र शोरुम : रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स जळगाव येथे सन 1974 पासून सोन्याचे दागिने विक्री व्यवसायात आहेत. जळगाव शहरात सोने अलंकारांचे दोन तर चांदी अलंकारांचे एक स्वतंत्र शोरूम आहे. याच प्रतिष्ठानाच्या औरंगाबाद,नाशिक व नांदेड अशा चार शहरात शाखांचा विस्तार झाला आहे. या सर्व ठिकाणी संपूर्ण भारतातून सोन्याचे दागिने खरेदीसाठी ग्राहक येतात. बदलत्या काळाचा विचार करुन आता 91:60 हॉलमार्क सोन्याचे दागिने खरेदी विक्री करताना वजनातील घट रद्द करण्याचे ठरविण्यात आले आहे. ज्या वजनाचा दागिना बदला दिला जाईल त्याच वजनाचा नवा दागिना ग्राहक खरेदी करु शकेल.
बाफनाची नविन उपक्रम
आपल्या व्यवसायातिल ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा कायम ठेवताना सोन्याच्या दागिन्यांसाठी नवी दर आकारणी ही सुध्दा ग्राहकांच्या लाभाचीच कशी राहिल याची काळजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सने घेतली आहे. शुद्धता, पारदर्शकता, विविधता व माफकता हेच व्यावसायिक तत्व कायम ठेवून 91:60 हॉलमार्क प्रमाणित सोन्याच्या दागिन्यांसाठी सर्वात कमी दर आकाणीचा हा नवा माईलस्टोन रतनलाल सी.बाफना ज्वेलर्स रोवत आहे. नव्या दर आकारणीचे ग्राहक स्वागत करतील असा विश्वास रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सच्या संचालकांनी व्यक्त केले.