धुळे। शिवआरोग्य सेनेचे प्रदेश अध्यक्षपद, शिवसेना महिला आघाडीच्या धुळे-नंदुरबार जिल्ह्याच्या सहसंपर्क प्रमुख या मोठ्या पदांना लाथाडत आज डॉ. माधुरी बाफना आणि त्यांचे पती डॉ. विपुल बाफना यांनी मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, धुळ्यातील भाजपा वाढविण्यासाठी सातत्याने झटणारे आणि विरोधी पक्षातील सक्षम मोहरे अचुक टिपण्यामध्ये तरबेज असलेले भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, डॉ संदीप पाटिल, सुनील पाटिल, नीलेश राजपूत, अनिल चौधरी, दिनेश शिनकर व डॉ विपुल बाफना, हिरामण गवळी, भिकन वराडे उपस्थित होते.
तीन वर्षांपुर्वी सेनेत झाल्या होत्या दाखल
विशेष म्हणजे येत्या दोन वर्षाआधी महानगरपालिका अथवा विधानसभा निवडणूक नसतांनादेखील डॉ. बाफना यांनी अचानकपणे, शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांना गाफिल ठेवत भाजपात प्रवेश केला. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीच्या आधी डॉ. माधुरी बाफना यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हाती घेतला होता. त्यानंतर शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात त्या उपस्थित रहायच्या अत्यंत क्रियाशिल अशा नेत्या म्हणून शिवसेनेत त्यांची ओळख होती. त्यांच्याकडे शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षपद व जिल्हा सहसंपर्कपद होते. धुळे शहरात घड़लेल्या अनेक दंगलींच्या वेळी देखील दोन्ही समाजाच्या रुग्णांना मोफत उपचार करून डॉ माधुरी बोरसे यांनी जातीय सलोखा राखण्यास योगदान दिले. डॉ माधुरी बाफना ह्या राज्याच्या माजी आरोग्यमंत्री डॉ शालिनीताई बोरसे व डॉ. सुधाकर बोरसे यांच्या कन्या आहेत. अभय युवा कल्याण केंद्र संचालित विविध शिक्षणसंस्थेच्या त्या संचालिका आहेत.
देशाचे पंतप्रधान मा नरेंद्रजी मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे, देशाचे संरक्षणमंत्री ना. डॉ. भामरे, राज्याचे पर्यटनमंत्री ना. जयकुमार रावल यांच्या प्रेरणेने भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश केला आहे. गेल्या वर्षभरापासुन चर्चा सुरु होती, आज योग जुळून आला. शिवसेना व शिवसेना पक्षप्रमुखांनी नेहमी मान दिला. सर्वसामान्य सैनिकांनी देखील सन्मान केला. सर्व आजी माजी पदाधिकार्यांनी धाकटी बहिण समजुन नेहमी मार्गदर्शन केले. त्या सर्वांच्या कायम मी ऋणात राहील.
डॉ. माधुरी बाफना
डॉ.बाफना ह्या शिवसेनेतून बाहेर पडल्या आहेत. त्या निष्ठावंत शिवसैनिक नाहीत. शिवसैंनिक कधीही शिवसेनेला सोडचिठ्ठी देत नाहीत.त्यामुळे नेते येतील जातील. शिवसैनिक हा शिवसेना सांभाळण्यासाठी सक्षम आणि भक्कम आहे. बाळासाहेबांचा आशिर्वाद आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे मार्गदर्शन यामुळे शिवसेनेची वाटचाल सुरु आहे आणि सुरुच राहील.
हिलाल माळी, शिवसेना जिल्हाप्रमुख
सामाजिक बांधलकी जपत व्यवसाय
अगदी कालपर्यंत त्या शिवसेनेत वावरत होत्या.शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकार्यांशी देखील त्यांचे सुर चांगल्याप्रकारे जुळलेले दिसत होते. त्यामुळे गटबाजीचा प्रश्न नव्हता. असे असतांना त्यांचा भाजपाप्रवेश शिवसैनिकांसाठी अनाकलनीय आणि धक्का देणारा असल्याचे बोलले जात आहे. शिव आरोग्य सेनेच्या प्रदेशाध्यक्षा म्हणून त्यांनी संपूर्ण राज्यात हजारो डॉक्टरांचे चांगले संघटन उभारले होते. धुळे शहरात गेल्या 15 वर्षापासून त्या एक निष्णात कैंसर सर्जन म्हणून परिचित आहेत. अनेक क्लिष्ट शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या. वैद्यकीय व्यवसाय करत असतांना त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासली. 80 फुट रोड स्थित त्यांच्या निरामय हॉस्पिटल व श्वास क्रिटीकेअर सेंटर ने सतत 5 वर्षानपासून जीवनदायी योजनेत संपूर्ण महाराष्ट्रात उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान कायम ठेवले आहे.