जळगाव। केशवस्मृती प्रतिष्ठान व आर.सी.बाफना फाउंडेशन ट्रस्ट संचलित मांगीलालजी बाफना नेत्रपेढीच्या माध्यमातून राष्ट्रीय नेत्रदान पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमाद्वारे नेत्रदान जनजागृती करण्यात येणार आहे. बाफना नेत्रपेढी मागील 17 वर्षांपासून झटत आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून 403 नेत्रदानाद्वारे 195 व्यक्तींना दृष्टी देण्यात नेत्रपेढीला यश आले आहे.
या नेत्रदूतांकरिता 23 ऑगस्ट रोजी चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यात जिल्ह्यातून 15 नेत्रदुत उपस्थित होते. हे चर्चा सत्र मांगीलालजी बाफना नेत्रपेढीत संपन्न झाले असून यात जिल्हाभर विविध कार्यक्रम घेण्याचे ठरविण्यात आले आहे. यावेळी नेत्रपेढीच्या व्यवस्थापिका राजश्री डोल्हारे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधी मार्गदर्शन केले तर तंत्रज्ञ समाधान चौधरी आणि केशवस्मृती प्रतिष्ठानचे जनसंपर्क अधिकारी कृणाल महाजन उपस्थित होते. तरी या जनजागृती मोहिमेत शहरातील गरजू, योगदान देणार्यांनी संपर्क साधावा.