लखनौ: १९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणी विशेष सीबीआय न्यायालय आज बुधवारी ३० रोजी निकाल देणार आहे. लखनौ विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. २८ वर्षापूर्वीचा हा खटला असून आज यावर निकाल देण्यात येणार आहे. लालकृष अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह अनेक विद्यमान खासदार, आमदार या प्रकरणात आरोपी आहेत. २६ आरोपी कोर्टात उपस्थित झाले आहेत. लालकृष अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह ६ जण अनुपस्थित आहेत, त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहावे लागणार आहे. वास्तू कोणी पाडली? यावर आजचा निकाल आहे. यात ३२ जण आरोपी आहेत. १ सप्टेंबरला निकालाचे लिखाण झाले आहे. थोड्याच वेळात निकालाचे वाचन होणार आहे.
बाबरी मशीद प्रकरणाचा कोर्टात प्रकरण आहे, दरम्यान अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटनही झाले आहे. त्यामुळे बाबरीची जमीन रामलल्लाची की बाबरीची? हा वाद मिटला आहे. थोड्याच वेळात निकाल स्पष्ट होईल.