बाबरी मशिदीबाबत तडजोड नाही : ओवेसी

0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – बाबरी मशिदीबाबत कसलीही तडजोड केली जाणार नाही. मशिदीची जमीन सोडण्याची मागणी करणार्‍यांवर सामाजिक बहिष्कार टाकावा, काही लोक मोदींच्या इशार्‍यावर नाचत आहेत. नडवी यांनी अयोध्येत बाबरी मशीदची जमीन राम मंदिरच्या निर्मितीसाठी सोडण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे त्यांना मंडळामधून हटवण्यात आले होते. अ.भा. मुस्लीम वैयक्तिक कायदे मंडळात (एआयएमपीएलबी) फूट पाडण्यासाठी मौलाना सलमान हुसेनी नडवी हे पंतप्रधान मोदींच्या इशार्‍यावर काम करत आहेत, असा आरोप एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसींनी केला आहे. ओवेसींनी मंडळाची तीन दिवसीय बैठकीनंतर बोलताना नडवी यांच्यावर टीका केली.

काय म्हणाले ओवेसी?
नडवी म्हणतात की, त्यांच्या प्रस्तावामुळे देशात शांतता आणि एकता प्रस्थापित होईल. मग आम्ही अरेबियामध्ये एकतेच्या नावाखाली मस्जिद-ए-अक्साला (जेरूसलेम येथे अल-अक्सा मस्जिद) सोडावे काय, असा सवाल ओवेसींनी उपस्थित केला. नडवी यांनी शुक्रवारी सुरू झालेल्या मंडळाच्या 26 व्या पूर्ण बैठकीच्या पूर्वसंध्येस बेंगळुरू येथे श्री श्री रविशंकर यांची भेट घेतली होती. सहा डिसेंबर 1992 पर्यंत ज्या जमिनीवर बाबरी मशीद उभी होती. ती जमीन राम मंदिर उभारण्यासाठी सोडली पाहिजे आणि दुसर्‍या ठिकाणी मशिदीची उभारली जावी, असा प्रस्ताव त्यांनी या बैठकीत मांडला होता.