बाबागिरीच्या आड भोंदूगिरी

0

स्वतःला देवाचा अवतार सांगून गेली अनेक वर्षे देशातील जनतेला लुबाडणार्‍या बाब राम रहीमचा पर्दाफार्श झाला आहे. बाबा राम रहीम हा गेली 15 वर्षे लोकांच्या डोळ्यात धूळ फेकून अंधश्रद्धेचे दुकान चालवत होता. एप्रिल 2002 मध्ये साध्वींचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप बाबा गुरमीत राम रहीमवर झाला होता. साध्वीने एप्रिल 2002 मध्ये तत्कालिन मीडिया, पंजाब-हरियाणा हायकोर्टाचे सरन्यायाधीश, पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना पत्र लिहून राम रहीमवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता.

यानंतर हायकोर्टाने 24 सप्टेंबर 2002 रोजी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता. डिसेंबर 2002: तक्रार योग्य असल्याचं सिद्ध झाल्यानंतर राम रहीमविरोधात कलम 376,506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसेच सीबीआयच्या तपासात राम राहीमच्या डेर्‍यात 1999 व 2001 मध्ये अनेक साध्वीचं लैंगिक शोषण झाल्याचेही स्पष्ट झाले होते. पण पीडित साध्वींचा शोध लागला नाही. व डेर्‍यात लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या पीडित मुलींना राम रहीम व त्याच्या समर्थकांकडून जीवे मारण्याची धमकी दिली जायची,असे एका पीडित मुलीने वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाबा रहीमच्या या कटात चक्क हरियाणाच्याच काही पोलिसांचा समावेश असल्याचे उघडकीस आले आहे.पण काही पोलिसांना बाबा राम राहीमच्या कटाचा अंदाज आल्यामुळे राम रहीमचा कट फसला गेला.राम रहिमचा हिंसा माजवण्याचा कट काही प्रमाणात फसला असला तरीही बाबा राम रहीमच्या समर्थकांनी माजवलेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान तर झालेच शिवाय 30 जण जागीच ठार झाले तर अडीचशे हुन अधिक जण जखमी झाले आहेत.

बाबा राम राहीमच्या गाझीयाबादच्या आश्रमात हत्यारांचा साठाही सापडला आहे.एकीकडे क्रूरकर्मा राम रहिमच्या दहशतीखाली जगणार्‍या पीडितांना न्याय मिळाला आहे.पण दुसरीकडे राम राहीमच्या हिंसा माजवण्याचा कटातच काही पोलिसांचा हातभार असणे हि बाब अत्यंत संतापजनक आहे.पण त्याहून अधिक संताप आणणारी बाब म्हणजे 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झालेल्या राम रहिमला मात्र तुरुंग प्रसशासानेच व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचा खुलासा एका वृत्तवाहिनीने केला आहे.न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर दोषी राम रहिमची रोहोटक तुरुंगात रवानगी करण्यात आली. तेव्हा तुरुंगात राम रहिमला ज्या खोलीत ठेवण्यात आले होते, ती खोली वातानुकूलित होती.तसेच त्या खोलीत बाबा रहिमला एसीबरोबरच पाण्याचा प्युरिफायर आणि सहाय्यक देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.तेव्हा बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्यावर एका दोषीला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्यानं सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तुरुंग प्रशासनाकडून बड्या कैद्यांचे पुरवण्यात येणार्‍या लाडामुळेच बाबा राम रहीम सारख्या लोकांचे फावते. कारण याआधीही संजय दत्त,आमदार रमेश कदम,छगन भुजबळ यांसारख्या अनेक बड्या मंडळींना तुरुंगातच आलिशान सेवा मिळत असल्याचे उघडकीस आले आहे.पण सरकारच्या मवाळ भूमिकेमुळेच आज तुरुंगातही मोठे कैदी एखाद्या राजासारखे वावरत आहे. देशातील भोंदू बाबांची वाढती प्रकरणे पाहता सरकारने अंधश्रद्धा माजवणार्‍या भोंदूबाबांविरोधात मोहीम उभारणे गरजेचे आहे. त्याचबरोबर प्रभावी यंत्रणा उभारून अशा भोंदू लोकांचा शोध घेऊन त्वरित कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे. जर लोक बाबा-बुवांच्या समागमाला गर्दी करत असतील तर आपणच अंधश्रद्धा माजवण्यास कुठेतरी जबाबदार असतो,याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आज लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेऊन समागमाच्या नावाखाली दानपेटीच्या माध्यमातून देशातील भोंदू मंडळी कोट्याधीश होत आहेत.तेव्हा लोकांनीही अशा भोंदू बाबांच्या समागमाला हजेरी लावणे टाळले पाहिजे.

– मनोहर विश्वासराव
शिवडी, मुंबई