मोठ्याप्रमाणात रायफल्स, काडतुसे सापडली
सिरसा : बाबा रामरहीमच्या डेरा सच्चा सौदा आश्रमाच्या सिरसा मुख्यालयातून हरियाणा पोलिसांनी मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. बारा रामरहीम सध्या बलात्कारप्रकरणात दोषी ठरल्याने तुरुंगात आहे. त्याच्या सिरसा येथील आश्रमाच्या मुख्यालयात हा शस्त्रसाठा सापडला आहे. यामध्ये रायफल्स आणि जीवंत काडतुसे आहेत.
शस्त्रसाठा कशासाठी?
27 ऑगस्टरोजी रामरहीम बाबाला बलात्काराच्या दोन प्रकरणांमध्ये प्रत्येकी दहा वर्षे अशी एकूण 20 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. तेव्हापासून रोहतकच्या सुनारिया कारागृहात बाबा शिक्षा भोगत आहे. हरियाणात बाबांच्या अटकेनंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला होता. एवढ्या मोठ्या संख्येने आश्रमात शस्त्रसाठा का करण्यात आला होता, याबाबत पोलिस माहिती घेत आहेत. या प्रकरणी न्यायदंडाधिकार्यांच्या नियुक्तीनंतरच डेराच्या मुख्यालयात सुरक्षा रक्षकांना प्रवेश करता येणार आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली डेरा सच्चा सौदाप्रकरणाची चौकशी सुरु आहे. त्यामुळे न्यायालयाकडून न्यायदंडाधिकार्यांच्या परवानगीने प्रशासनाला येथे थेट कारवाई करता येणार आहे.