रावेर : शहरातील बाबाजी नगरात घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधत 95 हजारांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
बंद घरे चोरट्यांच्या पथ्थ्यावर
शहरातील बाबाजी नगरात सेवानिवृत्त सफाई कामगार लक्ष्मण बाबू रील (53) हे कुटुंबास वास्तव्यास असून ते कुटुंबासह गावाला गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी 4 ते 6 दरम्यान साधली. चोरट्यांनी कपाटातील 95 हजार 400 रुपयांचे दागिणे लांबवले. रील कुटुंब गावावरून परतल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रावेर पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.