चंदिगड । एकेकाळी डेरा सच्चा सौदाशी संबंधित असलेले लोकं आता बलात्कारप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणार्या बाबा गुरमीत रामरहिम सिंगविरोधात एक-एक धक्कादायक असे दावे करत आहेत. एका वृत्तानुसार डेर्यात राम रहीमसाठी विषकन्यांचा एक ग्रुप होता. सुंदर मुलींना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना रामरहिमच्या गुहेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी विषकन्यांवर सोपवण्यात आली होती. या विषकन्या रामरहिमच्या अत्यंत निकट होत्या. इतकंच नाही, तर या सगळ्या परिस्थितीचा सामना त्यांनीही केलेला असायचा. या विषकन्या वेगवेगळ्या मुलींना आपल्या जाळ्यात अडकवत असत.
आदेशाचे पालन न करणार्यांवर कठोर कारवाई
1 विषकन्या या तरुणींना सांगत की, बाबाने त्यांना पवित्र करण्यासाठी आणि आशीर्वाद देण्यासाठी आपल्या गुहेत बोलावले आहे. फक्त इतकंच नाही, तर डेर्यात एखादी तरुणी रामरहिमच्या विरोधात तर बोलत नाही ना याकडे विषकन्यांचे लक्ष असायचे. जे कोणी असं करताना आढळत असे, त्यांना 24 तास अन्न आणि पाणी दिलं जात नसे.
2 ज्या तरुणी यानंतरही बंड मागे घेत नसत मानण्यास नकार देत असे, त्यांना ’मन सुधार’ खोलीत पाठवले जात असे. तिथे त्यांना खुर्चीला बांधून मारहाण केली जात असे.
3 ज्या तरुणी आदेशाचं पालन करण्यास नकार देत असत त्यांनाही ही शिक्षा दिली जात असे. ज्या तरुणी रागाने पाहताना आढळत असे त्यांना काळे फासून गाढवावरून धिंड काढली जात असे.
शारिरीक कारण देत मुली करत होत्या सुटका
पूर्वी डेरातच राहणार्या एका साध्वीने असा गौप्यस्फोट केला आहे की, रामरहिम आवडत्या मुलींना रोज रात्री 11 वाजता आपल्या गुहेत बोलवायचा. पीडित मुलगीदेखील या गुहेत एके रात्री गेली होती, मात्र मासिक पाळीचं कारण देत कशीबशी रामरहिमच्या तावडीतून सुटका केली. साध्वीनेही एका रात्री तिलाही राम रहीमच्या गुहेत पाठवण्यात आल्याची माहिती सांगितली. गुहेत गेल्यानंतर रामरहिमच्या घाणरेड्या हेतूची कल्पना आल्यानंतर तिने मासिक पाळीचे कारण दिले.