मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानपरिषदेत माहिती
नागपूर-मुंबईत दादर इथल्या इंदू मिल परिसरात होत असलेले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतराष्ट्रीय स्मारक २०२० पर्यंत पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, हे स्मारक वेळेत पूर्ण करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत केले, या स्मारकासाठी साडे बारा एकर जमीन अद्याप हस्तांतरित झालेली नाही असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश गजभिये यांनी लक्षवेधी सूचना मांडली या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी गजभिये यांचे आरोप फेटाळून लाले.
हे देखील वाचा
मुख्यमंत्री म्हणाले कि, स्मारकासाठी शंभर टक्के संपूर्ण साडेबारा एकर जागा हस्तांतरित झाली असून या जागेवर स्मारकासाठी आरक्षणही टाकण्यात आले आहे आणि काम कुठेही अडले नसून बांधकाम सुरू झाल्याची माहिती दिली .या जमिनिपैकी फक्त पाच टक्के भाग सीआरझेड मध्ये आहे तिथल्या बांधकामालाही लवकरच परवानगी मिळेल असे ते म्हणाले. या स्मारकासाठी निधीची कमतरता पडणार नाही अशी ग्वाही देत विधिमंडळाच्या सदस्यांना या स्मारकाचे प्रेझेंटेशन दाखवले जाईल असे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.