बाबा आसाराम यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला कोर्टाची परवानगी

0

नवी दिल्लीः लैंगिक छळाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले स्वयंघोषित बाबा आसाराम यांच्यावर आधारित पुस्तकाच्या प्रकाशनाला चंडीगड न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आसाराम यांच्यावरील पुस्तके बाजारात उपलब्ध होणार आहे. यूषीनोर मजूमदार यांनी पुस्तकाचे लेखन केले आहे.’गॉड ऑफ सिन: द कल्ट, द क्लाउट अॅंड डाउनफाल ऑफ आसाराम बापू’असे पुस्तकाचे नाव आहे.

न्यायालयाने या पुस्तकाच्या ऑनलाइन विक्रीस देखील परवानगी दिली आहे. पुस्तकाचे प्रकाशक पैंग्विन रैंडम हाउस इंडियाने न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

आसाराम आणि त्यांचे पुत्र नारायण साईवर लैंगिक छळ, जमिनीवर ताबा मिळविणे, अवैध संपत्ती, अंधश्रद्धा पसरविणे आदी आरोप आहे.