अमळनेर- शहरातील बाबा बोहरी उर्फ अली अजगर बोहरी (५४, न्यू प्लॉट, अमळनेर) यांच्या खुनाचा उलगडा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने केल्यानंतर अटकेतील तिघा आरोपींना अमळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार कैलास नवघरे याला आज सकाळी ११ वाजता घाटकोपर (मुंबई) येथून जळगाव गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले आहे. गेल्या २० दिवसांपासून तो फरार होता. तेंव्हा पासून पोलिसांकडून त्याचा शोध सुरु होता.