बाबुजींच्या जामनेरात काय सुरु आहे?

0

जळगाव। निवडणुकीत प्रचार करताना जवळच्या नात्यातील महिलेचा मृत्यू झाला. अजूनही त्या धक्क्यातून माझे कुटूंब सावरू शकलेले नाही आणि माझ्यावर मॅनेज होण्याचा आरोप करणारे ईश्वर जैन यांना चागले माहित आहे की मॅनेज होणे कशाला म्हणातात. त्यांना याचा चांगला अनुभव आहे.जामनेरात काय सुरू आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही असे चौधरी म्हणाले.

प्रतिमा मलिन करण्याचे कारस्थान
अजिंठा विश्रामगृहावर काल शरद पवार यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली या बैठकीत माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभेचे उमेदवार मनोज चौधरी यांच्यावर मॅनेज झाल्याचा आरोप केला होता. चौधरी यांनी तो आज स्पष्टपणे नाकारला. ते म्हणाले की, मी सुरेशदादा जैन यांच्या विरोधात निवडणूक लढलो. त्यावेळेसही माझ्या कुटुंबापर्यंत कोणीच टिकाटिपणी केली नाही. मात्र आज मला व माझ्या कुटूंबाला सार्वजनिक जीवनातून उठविण्यासाठी आरोप करण्यात येत आहेत

मुलासाठी केविलवाणी धडपड
माझ्या वाढदिवसापासून मी पुन्हा राजकारणात सक्रिय होणार आहे. मुलाला पुन्हा जळगावच्या राजकारणात पुढे आणण्यासाठी त्यांची केविलवाणी धडपड सुरु आहे.जामनेरात कोण मॅनेज झाले आहे. मला त्यावर भाष्य करण्याची गरज नाही. ते राष्ट्रवादीचे खासदार असतांना त्यांच्या पुत्राने गत मनपा निवडणुकीत जनक्रांतीची वेगळी चुल मांडली होती. पक्षाच्या विरोधात जावून मुलाला विधान परिषद निवडणूकीत त्यांनी निवडून आणले होते.