पाटणकरांचे कॉफी पेंटिंग्ज भावल्या: अनेक शाळांच्या भेटी
चाळीसगाव – कलामहर्षी केकी मूस बाबूजी यांच्या २९ व्या स्मृती दिनानिमित्त आयोजित चित्र प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून मुंबईच्या चित्रकार अॅड. क्रांती पाटणकर यांच्या कॉफी पेंटिंग्ज कलाप्रेमिंना भावल्या असून याच प्रदर्शनात चित्रकार शेख अलिकोद्दीन, प्रथमेश जाधव यांचे चित्र प्रदर्शन व राजश्री देशमुख हीचे रांगोळी प्रदर्शनदेखील भरविण्यात आले असून बुधवारी प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून सायंकाळी ५ वाजता समारोप होणार आहे. आज दिवसभरात काकासाहेब पूर्णपात्रे विद्यालय, गुरुकुल माध्यमिक विद्यालय या शाळेच्या विद्यार्थ्यांनी तसेच पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी चित्र प्रदर्शनाला भेट दिली.