बाभळी शिवारात लूट करुन ट्रकचालकाचा निर्घृण खून

0

धुळे । धुळे मुंबई-आग्रा महामार्गावर बाभळे ता.धुळे गावच्या शिवारात स्विफ्ट कारमधून आलेल्या सात दरोडेखोरांनी ट्रक चालकाचा खून करुन 20 हजाराची रोकड लुटल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. कविअर्सन गुरुमुर्ती (वय 23) रा.तमीळनाडू या ट्रकचालकाने शिंदखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार माचीसचा माल दिल्लीजवळ उतरवरुन परतीच्या प्रवासाला निघालेला टी.एन.67 ए.जे.9072 क्रमांकाचा ट्रक शिरपूर रस्त्यावर बाभळे फाट्याजवळ लुटण्यात आला.

खुनासह लुटीचा गुन्हा दाखल
गरुमुर्ती आणि अय्यतम स्वामी हे दोघे पळासनेरच्या पुढे रात्री 11 वाजता जेवणासाठी थांबले.धाब्यावर जेवण केल्यानंतर ते ट्रक घेवून धुळ्याच्या दिशेने निघालेले असतांना रात्री 12.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या ट्रकला एका सफेद रंगाच्या स्वीफ्ट कारने ओव्हरटेक केले. त्यानंतर कार रस्त्याच्या मधोमध उभी केली गेली. कारमधून सात तरुण उतरले. हे सर्वच्या सर्व ट्रकमध्ये घुसले. सात पैकी एकाने गुरुमुर्ती यांची गच्ची धरुन ट्रकवर ताबा मिळविला.या सात जणांनी ट्रकमधील पेटीची चाबी मागितली. चाबी न दिल्याने त्यांनी गुरुमर्ती आणि अय्यप्पा स्वामीला मारहाण सुरु केली. अय्यप्पा स्वामीच्या गुप्तांगावर जोराने लाथ मारल्याने त्याची हालचाल बंद झाली.त्यानंतर एकाने अय्यपा स्वामी यांच्या खिशातील चाबी आणि मोबाईल काढून घेतला. पेटीचे कुलुप उघडून त्यांनी 20 हजाराची रोकड काढली त्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करुन या दरोडे खोरांनी ट्रक कोठेच थांबवायचा नाही,ट्रक रस्त्यात थांबविला तर तुला जीवंत सोडणार नाही असा दम भरला त्यामुळे गुरुमुर्ती ट्रक चालवत धुळ्याच्या दिशेने निघाला.वाटेत त्याने अय्यप्पा स्वामीला आवाज देवून उठविण्याचा प्रयत्न केला. सोनगीर टोल नाका आल्यानंतर घडलेली घटना ट्रक मालकाला सांगितले. ट्रक मालकाने अय्यप्पास्वामीला उपचारासाठी दवाखान्यात नेले आणि पोलिसात तक्रार दे असे सांगितले. धुळ्यात एका दवाखान्यात अय्यप्पा स्वामीला दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषीत केले.