बाभळे उपसरपंचपदी यशवंत आवार बिनविरोध

0

किन्हवली । शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील बाभळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी नायकाचापाडा येथील यशवंत बबन आवार यांची बिनविरोध निवड झाली. बाभळे- नायकाचापाडा ग्रामपंचायतीची गेल्या ऑक्टोबर महिन्यात सात जागांसाठी निवडणूक झाली होती. यात प्रभाग क्रमांक1(अ)च्या अनुसूचित जमाती महिला व 2(ब)च्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या जागेसाठी उमेदवारी अर्जच न आल्याने उर्वरित पाच जागांसाठी मतदान झाले.

उपसरपंचांना दिल्या शुभेच्छा
बुधवारी सरपंच-उपसरपंच निवडीच्या दिवशी सरपंचपदाची संधी असतानाही पात्र सदस्य शांताबाई रघुनाथ मुकणे व अन्य एक सदस्य जानू कान्हू मुकणे हे सभागृहात अनुपस्थित राहिल्याने उपस्थित तीन सदस्यांतून यशवंत बबन आवार यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी अध्यासी अधिकारी म्हणून के.डब्ल्यू.मेंगाळ यांनी काम पाहिले. नवनिर्वाचीत उपसरपंचांचे शिवसेना उपतालुका प्रमुख विकास गगे व अन्य पदाधिकारी यांनी शुभेच्छा दिल्या.