बाभुळगावातील तिघांवर अ‍ॅट्रासिटी दाखल

0

वयोवृद्ध डॉक्टरांना मारहान करण्याचा प्रयत्न

इंदापूर :- बाभुळगाव (ता.इंदापूर) येथिल स्वःताच्या जमिनिची नांगरट व मोजणी करणारे वयोवृद्ध डॉ.सुभाष विरप्पा लांबतुरे यांना शेजारील शेताचे बांधकरी यांनी दगडाने मारहान करण्याचा प्रयत्न व जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी आमोल इंगळे,गुलाब इंगळे,राजेंद्र इंगळे(रा.बाभुळगाव) यांचेविरूद्ध जातीवाचक शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याबाबतची फिर्याद इंदापूर पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांचेविरूद्ध इंदापूर पोलीसांनी अणूसुचीत जाती जमाती प्रतिबंधक कायदा अ‍ॅक्ट 3(1),(4), (5),504,506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जीवे मारण्याची धकमकी दिली
याबाबत घटनेची हकिकत अशी की,दिनांक 3 मार्च 2018 रोजी फिर्यादी डॉ.सुभाष विरप्पा लांबतुरे.(वय.60) रा.बाभुळगाव ता.इंदापूर जि.पूणे हे व त्यांचे गावातील इतर लोक शिवाजी जावळे,हणूमंत आसबे,भारत आसबे,अंकुश मोरे,व नाना चव्हाण यांना घेवुन बाभुळगाव हद्दितील स्वमालकीची जमीन नांगरट व जमीन मोजणी करण्यासाठी सकाळी शेतात गेले असता शेजारील बांधकरी अमोल गुलाब इंगळे,गुलाब बाबु इंगळे,राजेंद्र गुलाब इंगळे शेतात आले व अडवणुक करून मी जमिनिची मोजणी करायची नाही असे म्हणत हातात दगड घेवून लांबतुरे यांच्या अंगावर धावुन गेले.तुला जीवे मारून टाकीन अशी धमकी दीली. तु तुझ्या शेतात यायचे नाही.तुला शेती बागायत करू देणार नाही म्हणत जातीवाचक शिविगाळ केली.

माझ्या जीवास धोका
सदर प्रकार हा शिवाजी शंकर जावळे व अंकुश मोरे वगैरे तीन चार लोक समक्ष असताना घडला भांडणे सोडविण्यासाठी ते मध्यस्थिसाठी आले असता तुम्ही कशाला यात भाग घेता? आमचे आम्ही बघुन घेऊ अशी दमदाटी केली.त्यामुळे या लोकांपासुन मला माझे जिवितास धोका असल्याची फिर्याद डॉ.लांबतुरे यांनी इंदापूर पोलीसात दिली आहे.त्यानुसार त्यांच्यावर अणुसुचित जाती जमाती प्रतीबंधक कायद्यानुसार त्यांचे विरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.