शिरपूर। तालुक्यातील बाभुळदे गावातील एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना 29 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. जिल्ह्यासह तालुक्यातील पहिलीच उष्माघाताने बळी गेल्याची घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बाभुळदे गावातील माजी महिला सरपंच मालतीबाई शेंनपडू निकुंभे 49 ह्यांना ताप आल्यामुळे शहराती खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते.
मात्र त्यांना 106 डिग्री ताप असल्यामुळे येथे उपचार शक्य नसल्याने डॉक्टरांनी त्यांना धुळ्याला घेऊन जाण्यास सांगितले. धुळे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान 30 रोजी सकाळी 9 वाजता बाभूळदे येथील राहत्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांच्या पशच्यात सेवा निवृत्त केंद्र प्रमुख पती,दोन मुले व एक मुलगी आहे.शिक्षक कर्मचारी पतसंस्थेचे राहुल निकुंभे यांच्या त्या आई होत.