बामखेडा त.त. । शहादा तालुक्यातील बामखेडा त.त.या गावासह परिसरातील हिंगणी, तोरखेडा, दोंदवाडे, कार्कदा खु. खापडूखेडा, कोंढावळ फेस, वडाळी, जयनगर, निंभोरा, खैरबे, भडगाव, देऊर, कळबू, सारंगखेडा, मनरद, जावदे त.ह., डेांगरगाव, प्रकाशा, डामरखेडा, शिरूड दिगर, कहाटळ, कवठळ, सोनवद, मा.मोहिदा आदी गावांमध्ये काही दिवसापूर्वी पावसाने दरमदार हजेरी लावून खरीप हंगामात कपाशीची लावणी केलेल्या शेतकर्यांमध्ये आशा लावून दिली. मात्र तब्बल पंधरा-अठरा दिवस उलटून देखील पाऊस परत आला नसल्यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत पडलेला दिसून येत आहे.
…तर शेतकर्यांना सोसावे लागणार आर्थिक नुकसान
खरीप हंगामात कपाशीची लावणी करणार्या परिसरातील शेतकर्यांना दुबार कपाशी लागवडीचे संकट बळीराजाला करावे लागते की काय ? अशी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतकर्यांनी खरीप लागवडीकरीता सावकाराकडून कर्ज घेऊन महागडी बी-बियाणे खरेदी करून लागवड केली आहे. ही महागडी बियाणी पाणी वेळेवर न पडल्यास वाया जावून आर्थिक नुकसान शेतकर्यांना सोसावे लागणार आहे. पाऊस लवकर व वेळेत आला नाही तर शेतकर्यांना दुबार लागवडीची वेळ आल्यास आर्थिक प्रश्न सोडावयाचा तरी कसा ? हा देखील प्रश्न परिसरातील शेतकर्यांना पडलेला आहे. परिसरात आणखी काही दिवस पावसाने हजेरी परिसरात लावली नाही तर बळीराजाला वरूणराजाला ‘बरसो रे मेघा, बरसो रे’ अशी प्रार्थना शेतकर्याला करण्याची वेळ येणार की काय ? असे संकेत परिसरात सर्वत्र दिसून येत आहे.