यावल : तालुक्यातील पाडळसे जवळील पाटचारीत बामणोद येथील 33 वर्षीय तरूणाचा मृतदेह आढळला. कैलास कडू सोनवणे (33, बामणोद, ता.यावल) असे मयताचे नाव आहे.
बामणोद, ता.यावल येथील रहिवासी कैलास कडू सोनवणे हा तरुण गत मंगळवारपासून बेपत्ता असल्याने कुटुंबियांनी फैजपूर पोलिसात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. दरम्यान, सोमवारी बामणोद-फैजपूर दरम्यानच्या पाटचारीत सकाळी शेतमजुरांना मृतदेह दिसून आला. घटनास्थळी पोलिसांनी जावून मृतदेह पाहिला असता तो कैलास सोनवणे असल्याचे निर्दशनास आले.
आत्महत्या केल्याची चर्चा
मंगळवारी बेपत्ता झालेल्या कैलास याचा नुकताच घटस्फोट झाला होता व पत्नीपासून विभक्त झाल्याच्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी ? असा अंदाज वर्तवला जात आहे. घटनास्थळीच यावलचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले. मयताच्या पश्चात मुलगी, आई, वडील, भाऊ असा परीवार आहे.