बामणोदच्या तरुणीवर अत्याचार ; दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात

0

यावल- तालुक्यातील बामणोद येथील ‘त्या’ 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी शनिवारी दोन संशयितांना यावल पोलिसांनी अटक केली आहे. 8 तेे 12 एप्रिल दरम्यान त्या पीडितावर शहरातील तीन व भुसावळातील दोन अशा पाच जणांनी बलात्कार केल्याचा गुन्हा यावल पोलिसात दाखल आहे.

यावल बसस्थानकातून केले अपहरण
बामणोद (ता. यावल) येथील 22 वर्षीय पीडित मुलीला 8 एप्रिल रोजी बसस्थानकातून शहरातील तीन तरूणांनी दुचाकीवर सोबत घेतले व बुरूज चौकाच्या पुढे एका इमारतीत व शहरातील विस्तारीत भागात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत 9 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर नेऊन बलात्कार केला व नंतर पहाटे भुसावळला सोेडले. रात्री पुन्हा यावलला आणले व पुन्हा 11 एप्रिलला भुसावळ येथे दोन तरुणांनी तिला रीक्षाव्दारे मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूरला नेले आणि तेथे बलात्कार केला, अशी आपबिती तरुणीने कथन केल्यावर यावल पोलिसात अज्ञात पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी शहरातील विविध भागातील सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज पाहून शहरातील दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची नावे जाहीर केलेली नाही. या संशयितांची पीडितेसमोर ओळख परेड केल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल, असे पोलिस निरीक्षक डी.के.परदेशी यांनी सांगितले आहे. पुढील तपास परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, उपनिरीक्षक सुनिता कोळपकर, हवालदार संजय तायडे करीत आहे.