बामणोदच्या दाम्पत्याची भुसावळातील तापी पात्रात आत्महत्या

Suicide of Bamanod’s couple in Tapi Patra in Bhusawal भुसावळ : यावल तालुक्यातील बामणोद येथील दाम्पत्याने भुसावळातील तापी पात्रात उडी घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. वसंत नेमाडे (63) व मालतीबाई वसंत नेमाडे (55, दोन्ही रा.बामणोद, ता.यावल) अशी मयतांची नावे आहेत. दाम्पत्याने आत्महत्या का केली? याचे ठोस कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुचाकीवरून बाहेर पडले दाम्पत्य
समजलेल्या माहितीनुसार, नेमाडे दाम्पत्य रविवारी दुपारीच बामणोद येथील राहत्या घरातून बाहेर पडली. तापी नदीपात्रातील राहुल नगराजवळील (गणपती विसर्जन स्थळ परीसरात) या दाम्पत्याने उडी घेत आत्महत्या केली मात्र ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नदीपात्रात बेवारस दुचाकी उभी असल्याची माहिती शहर पोलिसांना कळवल्यानंतर सहाय्यक निरीक्षक संदीप दुनगहू, इक्बाल सैय्यद, मोहन पाटील, भूषण चौधरी, रज्जाक खान आदींनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी नदीपात्रात मृतदेह तरंगताना आढळल्यानंतर स्थानिक पोहणार्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ते ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आले. मयत दाम्पत्याच्या पश्चात मुलगा, दोन मुलगी, सून असा परीवार आहे. दाम्पत्याने आत्महत्या का केली? या बाबत ठोस माहिती कळू शकली नाही.