एक गंभीर , दोघांना किरकोळ ईजा ; अंजाळेचा संशयीत ताब्यात
फैजपूर : परीक्षार्थीस पीएसएमएस हायस्कूलमध्ये सोडण्यासाठी आल्यानंतर तरुणांमध्ये वाद झाल्याने अंजाळेच्या तरुणाने मिनी कटर (चाकू) ने हल्ला केल्याने चार वद्यार्थी जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घेतली. हल्ला करणार्या निखील रवींद्र सपकाळे (22, रा.अंजाळे) या संशयीतास फैजपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती कळताच फैजपूरचे एपीआय दत्तात्रय निकम यांनी तातडीने धाव घेत शांतता प्रस्थापीत करून विद्यार्थ्यांच्या मनातील भीती दूर करीत संशयीतास ताब्यात घेतले. या हल्ल्यात रुपेश गुणवंत नन्नवरे (19), मोहित गोपाळ सोनवणे (18), सौरभ सोनवणे, गौरव अरुण सोनवणे (15) हे जखमी झाले. गुरुवारी दहावी इंग्रजीचा पेपर असताना संशयीताने परीक्षार्थीस परीक्षा हॉलमध्ये सोडल्यानंतर दरवाजा बंद केल्यावरून वाद उद्भवल्याचे समजते.