भुसावळ- यावल तालुक्यातील बामणोद येथील 17 वर्षीय युवकाचा पाटाच्या पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घडली. तेजस सुनील पाटील (17) असे मृत युवकाचे नाव आहे. तेजससह त्याचे काही मित्र वनोली-कोसगाव पाटात पोहत असताना तेजस अचानक बुडाला तर फैजपूर पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, हवालदार ईकबाल सैय्यद, कॉन्स्टेबल उमेश चौधरी आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने बामणोद गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.