बामणोद : गावात काही तरुणांचे रागात बघत असल्याच्या कारणावरूण भांडण झाले होते. त्यातच पोलिसांकडे तक्रार झाल्यानंतर त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले व सायंकाळी सोडल्यानंतर संशयीत गावात परतले. बसस्थानकाजवळ संशयीत आल्यानंतर त्यांचा पुन्हा एका गटाशी वाद झाल्याने दोन्ही गट भिडल्याने तुफान दगड-विटांचा मारा करण्यात आल्याने दोन्ही गटातील तीन ते चार जण जखमी झाले. या घटनेत नेमके कोण जखमी झाले हे रात्री उशिरापर्यंत कळू शकले नाही तर शनिवारी रात्री सात वाजेच्या सुमारास घडना घडल्यानंतर पोलिस प्रशासनाने धाव घेत शांतता प्रस्थापित केली. पोलिस उपअधीक्षक राजेंद्र रायसिंग, सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय निकम व नजीकच्या पोलिस ठाण्यातील कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. गावात तणावपूर्ण शांतता असून संशयीतांची रात्री उशिरा धरपकड सुरू करण्यात आली होती.