बामणोद चाकू हल्ल्यातील संशयीताला पोलीस कोठडी

0

फैजपूर:- परीक्षा केंद्राचा दरवाजा बंद करण्याच्या कारणातून तरुणांमध्ये वाद उफाळल्याने बामणोदच्या पीएसएमएस हायस्कूलमध्ये अंजाळेच्या तरुणाने चौघांवर चाकू हल्ला केल्याची घटना गुरुवार, 8 रोजी सकाळी घडली होती. या गुन्ह्याप्रकरणी संशयीत आरोपी निखील राजेंद्र सपकाळे (21 रा.अंजाळे) यास अटक केल्यानंतर शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. संशयीत आरोपी हा बारावीचा परीक्षार्थी असून शनिवारी सकाळी पुन्हा त्यास न्यायालयात हजर करून परीक्षेस बसू देण्यासाठी परवानगी घेण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.