यावल (प्रतिनिधी ) तालुक्यातील बामणोय येथील एका तरुणाने तापी नदीच्या पुलावरून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे त्या संदर्भात मिळालेली माहिती अशी की देवेंद्र पंकज पाटील व 19 वर्ष राहणार इंदिरानगर बामनोद तालुका यावल या तरुणाने दिनांक ३ सप्टेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता त्यास तापी नदीच्या पुलावरून उडी घेतल्या नंतर झालेल्या गंभीर दुखापतीमुळेथे देवेन्द्र पाटील यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात घेवुन जात असतांना उपचारापुर्वी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटनासमोर आली आहे . या संदर्भात मयता चा भाऊ भूषण पंकज पाटील यांनी फैजपुर तालुका यावल पोलीस ठाण्यात खबर दिल्यावरून अकस्मात मूर्तीची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल गोकुळ तायडे हे पण नितीन करीत आहे. आत्महत्या करून मरण पावलेल्या देवेंद्र पाटील याच्या मृतदेहावर यावल च्या ग्रामीण रुग्णालयात सर्व शवविच्छेदन करण्यात आले असून देवेंद्र पाटील या तरूणाने आत्महत्या सारखे पाऊल का उचलले हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.