पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात मोर्चा
भुसावळ- यावल तालुक्यातील बामणोद येथे उसळलेल्या दंगल प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध दाखल गुन्हे मागे घ्यावेत, गावात शांतता समितीची बैठक घ्यावी आदी मागण्यासाठी पीआरपी प्रदेश महामंत्री जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात बामणोद ते फैजपूर पायी मोर्चा 12 रोजी सकाळी 10 वाजता निघणार आहे. बामणोद येथील संविधान नगरातून ईन्साफ मोर्चाला प्रारंभ होईल. या मोर्चात राकेश बग्गन, आरीफ शेख यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.