फैजपूर : यावल तालुक्यातील बामणोद येथून अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. या प्रकरणी फैजपूर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
17 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवले
यावल तालुक्यातील बामणोद येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शनिवार, 11 जून रोजी सकाळी साडे आठ वाजता अल्पवयीन मुलगी घरी एकटी असतांना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. पीडीत मुलीच्या कुटुंबियांनी तिचा परीसरासह नातेवाईक आणि मैत्रिणींकडे शोधाशोध केली परंतू ती कुठेही आढळून आली नाही. सोमवारी कुटुंबियांनी फैजपूर पोलिस ठाण्यात दिलेल्या क्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एम.जे. शेख करीत आहे.