बामणोद शिवारात अनोळखीचा मृत्यू

0

फैजपूर- बामणोद शिवारातील न्हावी रस्त्यावर राजू राणे यांच्या शेताच्या चारीत 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मंगळवारी दुपारी 12.20 वाजेपूर्वी मृतदेह आढळला. या प्रकरणी बामणोद उपसरपंच दिलीप पितांबर भालेराव यांनी फैजपूर पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास उपनिरीक्षक जिजाबराव पाटील करीत आहेत.