बामसेफचे भुसावळात उद्या जिल्हा अधिवेशन

0

भुसावळ- मूलनिवासी बहुजन समाजातील वाढत्या बेकारीसाठी प्रस्थापित शासक वर्ग व त्यांचा कार्पोरेट (भांडवलदार) जबाबदार असून या विषयावर आधारीत जळगाव जिल्हा बामसेफचे जिल्हास्तरीय अधिवेशन रविवार, 17 रोजी भुसावळातील पंचायत समितीच्या सभागृहात होत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्याध्यापक सतीश जंगले यांच्या हस्ते होईल. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून किशोर ढमाळे, राहुल वाघ हे उपस्थित राहतील. बामसेफ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रवींद्र मोरे अध्यक्षस्थानी असतील. प्रमुख पाहुणे म्हणून सलीम शेख, हुसेन गवळी, मनोज सोनवणे, सुधीर जंजाळे यांच्यासह बौद्ध विकास समिती, आम्ही प्रबोधनकार प्रतिष्ठान उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाला बहूजन समाजातील प्रबुद्ध नागरीकांनी उपस्थित द्यावी, असे आवाहन बामसेफचे जिल्हा सचिव रमेश साळवे व आयोजकांनी केले आहे.