बामोशी बाबा दर्ग्यावरुन 20 वर्षीय तरुणी बेपत्ता

0
चाळीसगाव – सटाणा तालुक्यातील लखमापुर येथील वीस वर्षीय तरुणी येथील पीर मुसा कादरीबाबा उर्फ बामोशी बाबा दर्ग्यावर श्रद्धेपोठी उपचारासाठी आई वडीलांसोबत आली होती. १० सप्टेंबर २०१८ रोजी दर्गा परीसरात परीवारासह झोपलेली असताना तेथुन ती बेपत्ता झाली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे मुलगी बेपत्ता झाल्या पासुन आई वंडीलांचे अशृ अनावर झाले असुन मुलीचा तपास लवकर लागावा यासाठी त्यांनी राज्य महिला आयोगाकडे देखील धाव घेतली आहे.
प्राप्त माहिती नुसार, लखमापुर ता.सटाणा जि.नाशिक येथील २० वर्षीय तरुणी अंजली आण्णा पवार आजारी असल्यामुळे तिच्यावर उपचार करून देखील काही सुधारणा होत नसल्याने चाळीसगाव येथील पिर मुसा कादरी बाबा दर्ग्यावर अशा प्रकारचे आजार बरे होतात अशी माहिती त्यांना मिळाल्यावर त्या श्रध्देपोठी तरुणीची वडील आण्णा पवार हे परीवारासह २३ ऑगस्ट २०१८ रोजी आले होते. जवळपास १० सप्टेंबरपर्यंत तेथे राहिले होते. १० रोजी रात्री आण्णा पवार मुलगी अंजली व मुलगा हे दर्गावर झोपले असताना पहाटे ४ वाजेच्या सुमारास मुलगी अंजली बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र मुलगी मिळुन न आल्याने चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला खबर दिल्या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.
तरूणी बेपत्ता झाल्याने परीसरात खळबळ
मुलगी हरविल्यापासुन आण्णा पवार कुंटुंबीय माणसिक धक्यात आले असून मुलीचा शोध घेण्यासाठी सैरा वैरा भडकत आहेत मुलगी बेपत्ता होऊन सहा  दिवसांच्या वर अवधी लोटला असुन तरी देखील पवार कुंटुबीय चाळीसगाव परीसरात मुलीचा शोध घेत आहे. मुलीचा तपास लवकर लागावा. यासाठी राज्य महिला आयोगाच्या सदस्या देवयानीताई ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. दरम्यान या घटनेमुळे परीसरात एकच खळबळ उडाली आहे.