मुंबई । मुंबई महापालिकेत 1 ऑगस्ट 2017 पासून लागू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक हजेरीच्या आता काटेकोर अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. मागील 3 महिने प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आलेली बायोमेट्रिक हजेरी प्रणालीची 1 नोव्हेंबरपासून काटेकोर अंमलबजावणी होत आहे. त्यामुळे जर कर्मचार्याने बायोमेट्रिक हजेरी नोंदवल्यास त्यांना त्या महिन्याचा पगार मिळणार नाही. जो कर्मचारी बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवणार नाही, त्यांचा पगार रोखून ठेवण्याचे आदेश महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने दिले आहेत.
प्रशासनाकडून परिपत्रक जारी
मुंबई महापालिकेतील सुमारे 1 लाख कर्मचार्यांपैकी 94 हजार 482 कर्मचार्यांनी आपला आधारकार्ड नंबर लिंक करून बायोमेट्रिक प्रणालीत नोंद केला आहे. यासाठी महापालिकेने 3900 मशीन लावल्या आहेत. परंतु अनेकदा नेट कनेक्ट होत नसल्यामुळे अनेकदा कर्मचारी यांना तासनतास महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 31 ऑक्टोबरला परिपत्रक जारी करून बायोमेट्रिक प्रणालीत उपस्थितीनुसार मासिक वेतनाची आकारणी करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांना आपली उपस्थिती बायोमेट्रिक प्रणाली अंतर्गत नोंदविणे बंधनकारक आहे.
पालिका शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य
सर्व प्रकारच्या रजा, बाहेरील काम, उशिरा येणे तसेच पगार थांबवणे आदी सर्व बाबींचा समावेश या प्रणालीत केला आहे. बायोमेट्रिक प्रणालीत जे अधिकारी, कर्मचारी आणि कामगार यांनी आपली उपस्थिती नोंदवणार नाहीत अशा सर्व कर्मचार्यांचे पगार थांबवण्याची जबाबदारी संबंधित प्रशासकीय अधिकारी तथा कार्यालयाची राहील. त्यामुळे सर्व कर्मचार्यांनी आपली उपस्थिती बायोमेट्रिक प्रणालीतच नोंदवावी आणि जे अशाप्रकारे उपस्थिती नोंदवणार नाही, त्यांचा मासिक पगार न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही संबंधित खाते आणि विभागाची राहील, असेही आदेश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले.