बारामतीत प्रतिबंधात्मक आदेश

0

बारामती । सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने बारामती उपविभागात 22 सप्टेंबर ते 22 ऑक्टोंबर 2017 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात येत असल्याचे उपविभागीय दंडाधिकारी हेमंत निकम यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

या आदेशान्वये शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणीही धुम्रपान करु नये, कोणत्याही प्रकारचे दारु बनविण्याचे काम करू नये, फटाके उडवू नयेत. शोभेच्या दारु आणि फटाके व साठा केलेल्या दुकानापासून 100 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारच्या शोभेच्या दारुचे रॅकेट परिक्षणासाठी उडवता येणार नसल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती शिक्षेस पात्र राहणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.