बारामती । बारामतीमध्ये प्लास्टीकचा कोबी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मोरोपंत सोसायटीतील मंगला सुभाष वजरीनकर यांनी हा कोबी मंडईमधून आणला होता. तो चिरताना त्यातून मोठे तंतू निघण्यास सुरुवात झाल्याने त्यांना शंका आली. त्यांनी पाने जाण्याचा प्रयत्न केला. त्यावरून हा कोबी प्लास्टिकचा असल्याचे समोर आले. कोबी कापत असताना त्यातून मोठे तंतू निघत असल्याने वजरीनकर यांना शंका आली होती.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी चीनमध्ये प्लास्टीकचा कोबी बनविला जातो हे व्हॉट्सअॅपला पाहिले होते. त्यामुळे त्यांचा संशय अधिकच बळावला. तंतू तोडण्याचा प्रयत्न केला असता ते तुटले नाहीत. त्यामुळे त्यांची शंका बळावली. कोबीचे पान त्यांनी गॅसवर जाळण्याचा प्रयत्न केला असता पानाचा स्तर थोडासा काळपट तर थोडासा हिरवट असा तयार झाला. काळपट भाग हा प्लास्टीक जाळल्याच्या अवस्थेसारखा दिसू लागला. हा कोबी रासायनिक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविणार असल्याचे वजरीनकर यांनी सांगितले.